वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 89. संन्यासी - अभंग २६२६ ते २६३५

दीनाचें उपार्जन करी

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087442 · अभंग क्र. २६३०

2630.
दीनाचें उपार्जन करी पोटासाठीं । म्हणे मज लंगोटी द्याहो कोण्हीं ॥१॥
घेउनी संन्यास हिंडे दारोदारी । ' नारायण ' करी पोटासाठी ॥२॥
काम क्रोध वैरी सदोदित पीडी । वरी शेंडी बोडी करुनीं काई ॥३॥
व्यर्थ विटंबना करिती जनांत । संन्याशाची मात सोंग दावी ॥४॥
एका जनार्दनी संन्यास साचा । रामनाम वाचा उच्चार करी ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग