वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 95. वैराग्य - अभंग २६४८ ते २६५४

वैराग्य - अभंग २६४८

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087455 · अभंग क्र. २६४८

2648.
वैराग्य - अभंग २६४८ ते २६५४

काय ते वैराग्य बोकडाचे परी । भलतीया भरीं पडतसे ॥१॥
काय ती समाधी कुकुटाचे परी । पुढेंचि उकरी लाभ तेणे ॥२॥
बैसोनी आसनी वाउगें ते ध्यान । सदां लक्ष्मी मान आपुलाची ॥३॥
घालूनिया जेठा बैसतो करंटा । करीतसे चेष्टा मर्कटापरी ॥४॥
नाही शुद्ध कर्म योगाचा विचार । सदां परद्वार लक्षीतसे ॥५॥
ऐशिया पामरा कासया तो बोध । एका जनार्दनी शुद्ध खडक जैसा ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग