वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

गोमटया बीजाची फळेंही

🙏 3. संत तुकाराम · ABH-077104 · अभंग क्र. २६५८

2658.
गोमटया बीजाची फळेंही गोमटी । वाहे तेचि पोटी समतुक ॥१॥
जातीच्या संतोषे चित्तासी विश्रांति । परतोनि मागुती फिरो नेणे ॥धृपद॥
खऱ्याचे पारखी येत नाही तोटा । निवडे तो खोटा ढाळे दुरी ॥२॥
तुका म्हणे मज सत्यासी आवडी । करिता तांतडी येत नाही ॥३॥

अर्थ :
चांगल्या बीजाला फळेही चांगलेच येतात आणि तसेच चांगले बीज पुन्हा आपल्या पोटात धारण करतात. ज्यांचे चित्त परमार्थामध्ये शुध्द जातीचे असते त्यांचे चित्त नेहमी हरीच्या ठिकाणीच असते त्यामुळे त्यांच्या चित्ताला समाधान व विश्रांती प्राप्त होते व त्यांचे चित्त हरीच्या ठिकाणाहून परत माघारी फिरत नाही. कोणत्याही ख-या गोष्टीची परीक्षा घेतली तरी त्यात काही तोटा होत नाही याउलट त्यामध्ये काही खोटेपणा आढळला तरी तो निवडून बाजूला टाकता येतो. तुकाराम महाराज म्हणतात, मला तर एक सत्याचीच आवड आहे आणि त्यासाठी तातडी केल्याने काहीही हाताला येत नाही.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग