वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

आता तळमळ । केली पाहि

🙏 3. संत तुकाराम · ABH-077063 · अभंग क्र. २६१८

2618.
आता तळमळ । केली पाहिजे शीतळ ॥१॥
पाहा करील ते देव । पायी ठेवुनिया भाव ॥धृपद॥
तोचि अन्नदाता । नाही आणिकाची सत्ता ॥२॥
तुका म्हणे दासा । नुपेक्षील हा भरवसा ॥३॥

अर्थ :
आता देहाला पोसण्याची जी तळमळ आहे ती शीतळ केली पाहिजे. आणि देव जे काही करील ते देवाच्या पायाच्या ठिकाणी श्रेष्ठ भक्तीभाव ठेवून फक्त पाहा. तो देव सर्वाचा अन्नदाता आहे त्याच्यावाचून दुसरी कोणाचीही येथे सत्ता नाही. तुकाराम महाराज म्हणतात, तो हरी त्याच्या दासाची उपेक्षा कधीही करणार नाही असा माझा पूर्ण भरवसा आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग