वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

धोंड्यासवे आदिळता फु

🙏 3. संत तुकाराम · ABH-077126 · अभंग क्र. २६१७

2617.
धोंड्यासवे आदिळता फुटे डोके । तो तो त्याच्या दुःखे घामेजेना ॥१॥
इंगळासी सन्निधान अतित्याई । क्षेम देता काई सुख वाटे ॥धृपद॥
सप्रेमे कुरवाळी महाफणी व्याळ । आपुले तो ढाळ सांडी केवी ॥२॥
तुका म्हणे आम्हासवे जो रुसला । तयाचा अबोला आकाशासी ॥३॥

अर्थ :
दगडावर डोके आदळले की डोके फुटेल परंतू त्याच्या दु:खाने दगडाला कधीही घाम फुटणार नाही. एखादया आततायी मनुष्याने इंगळाला किंवा विंचवाला जवळ घेऊन प्रेमाने आलिंगन दिले तर त्याला त्यापासून काही सुख वाटणार आहे काय ? महाफणी असलेल्या नागाला प्रेमाने कुरवाळले तरी तो आपला दंश करण्याचा जो मूळ स्वभाव आहे तो सोडील काय ? तुकाराम महाराज म्हणतात, जो आमच्याशी रुसतो तो स्वत: आकाशा बरोबरच अबोला आहे म्हणजे आमच्याशी जो रुसतो त्याचेच नुकसान होते.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग