कनकफळ भक्षितां सहज भ
2654.
कनकफळ भक्षितां सहज भ्रांति येती । तैशी ही फजिती संसारिका ॥१॥
मर्कटाचीये परे नाचे घरोघरी । नाचवोनि भरी पोट तैसे ॥२॥
करिती तितुके अवघे ते सोंग । नाही कांही रंग भाव भक्ति ॥३॥
एका जनार्दनी पडिलासे भ्रांती । नेणे कधी स्तुति देवाची तो ॥४॥
