वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

तुम्हासी हे अवघे ठाव

🙏 3. संत तुकाराम · ABH-077427 · अभंग क्र. २६४४

2644.
तुम्हासी हे अवघे ठावे । किती द्यावे स्मरण ॥१॥
का बा तुम्ही ऐसे नेणे । निष्ठुर पणे टाळितसा ॥धृपद॥
आळविता मायबापा । नये कृपा अझूनि ॥२॥
तुका म्हणे जगदीशा । काय असा निजले ॥३॥

अर्थ :
देवा तुम्हाला माझे सर्व दु:ख माहित आहे तरी तुम्हाला त्याची किती वेळा आठवण करुन दयावी. देवा तुम्ही मला निष्ठूरपणे का टाळता आहात माझे दु:ख तुम्हाला का समजत नाही ? हे अनंता मायबापा मी तुला इतक्या वेळा आळवले आहे तरी देखील अजून तुझी कृपा माझ्यावर का झाली नाही ? तुकाराम महाराज म्हणतात, हे जगदीशा मला तुमची कृपा हवी आहे ती कृपा तुम्ही माझ्यावर करा असे काय निजले आहात ?

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग