वासनेंचे वसन समूळ फा
2635.
वासनेंचे वसन समूळ फाडी । त्रिगुण जानवेंक तयावरी तोडी ॥१॥
यापरी जाणोनी संन्यासु घेई । गुरुवचनें सुखे विचरतु जाई ॥२॥
मन दंडिजे तोचि घेई सुंदंडु । जीवनेंविण कमंडलु अखंडु ॥३॥
एकाक्षरजप करी । क्षराक्षरातीत धरणा धरी ॥४॥
स्वानंदाचे करी करपात्र । सहजीं सहज जेवी नारायण वक्त्र ॥५॥
एका जनार्दनी सहज संन्यासु । सहजीं सहज तेथे न लगे आयासु ॥६॥
