वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

आता नव्हे गोड करिता

🙏 3. संत तुकाराम · ABH-077265 · अभंग क्र. २६५०

2650.
आता नव्हे गोड करिता संसार । आणीक संचार झाला माजी ॥१॥
ब्रम्हरसे गेले भरूनिया अंग । आधील तो रंग पालटला ॥धृपद॥
रसनेचिये रुची कंठी नारायण । बैसोनिया मन निवविले ॥२॥
तुका म्हणे आता बैसलो ठाकणी । इच्छेची ते धणी पुरईल ॥३॥

अर्थ :
संसार करताना आता मला गोड वाटत नाही कारण एक वेगळाच संचार माझ्यामध्ये झाला आहे. तो संचार म्हणजे माझ्या संपूर्ण अंगामध्ये ब्रम्हरसच भरुन गेले आहे आणि पहिला जो माझ्या ठिकाणी देहाभिमानाचा रंग होता तो आता पूर्णपणे पालटला आहे. आता रसनेला म्हणजे जिव्हेला नारायणाचे नामच आवडत आहे आणि कंठामध्येच नारायण वसला त्यामुळे माझे मनही आता शांत झाले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मी आता एकाच ठिकाणी बसलो आहे मी कोठेही जाणार नाही व मी जेथे बसलो आहे तेथेच माझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग