एकाचिये वेठी । सापडल
2639.
एकाचिये वेठी । सापडलो फुकासाठी ॥१॥
घेतो काम सत्ताबळे । माझे करूनि भेंडोळे ॥धृपद॥
धावे मागे मागे । जाय तिकडे चालत लागे ॥२॥
तुका म्हणे नेले । माझे सर्वस्वे विठ्ठले ॥३॥
अर्थ :
मी एकाच्याच हाती त्याची वेठबिगारी करण्यासाठी सापडलो आहे. तो माझ्याकडून त्याच्या सत्तेने बळजबरीने काम करवून घेतो त्याने तर मातीचे ढेकूळच करुन टाकले आहे. तो सारखा माझ्या मागे मागे धावत असतो मी जिकडे जाईल तिकडे माझ्या मागे लागत असतो. तुकाराम महाराज म्हणतात, असा तो विठ्ठल आहे व त्याने माझे सर्वस्व हरण केले आहे.
