वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

जाणिवेच्या भारे चेंप

🙏 3. संत तुकाराम · ABH-077359 · अभंग क्र. २६५५

2655.
जाणिवेच्या भारे चेंपला उर । सदा बुरबुर सरेचि ना ॥१॥
किती याचे ऐको कानी । मारिले घाणी नाळकरी ॥धृपद॥
मिठेंविण आळणी बोल । कोरडी फोल घसघस ॥२॥
तुका म्हणे डेंगा न कळे हित । किती फजित करू तरी ॥३॥

अर्थ :
काही लोक इतके शब्दज्ञानी असतात की त्यांच्या शब्दज्ञानामुळे समोरच्याचा ऊर दडपून जातो आणि त्यांची ती शब्दज्ञानाची भूरभूर चालू झाली की काही केल्या संपतच नाही अशा शब्दज्ञानी लोकांचे बोलणे तरी आम्ही आमच्या कानाने किती ऐकावे त्यांचे बोलणे म्हणजे जसे जनावराची नाळ दुर्गंध टाकते व येणा-या जाणाऱ्याला त्रास देते त्याच प्रकारचे त्यांचे बोल असतात. मीठेविना अन्न जर अळणी असेल तर त्याची चव लागत नाही उपयोग होत नाही त्याप्रमाणे केवळ शब्दज्ञान ज्याच्याकडे असतात त्याचे बोलणे म्हणजे अनुभवा वाचून घासाघीसच असते. तुकाराम महाराज म्हणतात, अशा डेंगळया मनुष्याला स्वत:चे हित कशात आहे हे कळत नाही त्याची फजिती आम्ही किती करु ?

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग