वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

सिद्धीचा दास नव्हे श

🙏 3. संत तुकाराम · ABH-077371 · अभंग क्र. २६२१

2621.
सिद्धीचा दास नव्हे श्रुतीचा अंकिला । होईन विठ्ठला दास तुझा ॥१॥
सर्व सुख असे माझिये मानसी । राहिले तयासी नाश नाही ॥धृपद॥
तेणे पुण्य पाप न देखे लोचनी । आणिका वाचूनि पांडुरंगा ॥२॥
न करी मी आस साधनी सायास । भक्तीप्रेमरस सांडूनिया ॥३॥
गर्भवासी दुःख नाही येता जाता । हृदयी असता नाम तुझे ॥४॥
तुका म्हणे तुझा होईन अंकिला । न भे मी विठ्ठला कळिकाळासी ॥५॥

अर्थ :
हे विठ्ठला मी सिध्दीचा दास किंवा श्रृतीचा अंकीत होणार नाही तर केवळ तुझा दासच होईन. कारण तुझी भक्ती केल्यामुळे जगातील सर्व सुख माझ्या अंत:करणात येऊन राहीले आहेत व त्या सुखाचा कधीही नाश होत नाही. हे पाडूरंगा मी तुझ्यावाचून इतर कोणालाही माझ्या डोळयाने पाहणार नाही व त्यामुळेच मला पाप पुण्य लागणार नाही. देवा मी तुझ्या भक्ती प्रेमरसावाचून इतर कोणतीही इच्छा आणि कोणत्याही साधनाचे सायास करणार नाही. देवा तुझे नाम जर माझ्या ह्दयात आहे म्हणजेच असले तर मला कितीही जन्ममरणाचे गर्भवास भोगताना दु:ख वाटणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, हे विठ्ठला मी तुझाच अंकीत होईन मग मी कळी काळाला देखील भिणार नाही.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग