तीर्थी - अभंग २६४३ त
2643.
तीर्थी - अभंग २६४३ ते २६४४
तीर्था जाती उदंड । त्याचे 2643
तीर्था जाती उदंड । त्याचे पाठीमागें तोंड ॥१॥
मन वासना ठेउनी घरी । तीर्थां नेली भांडखोरी ॥२॥
गंगेंत मारिता बुडी । मन लागले बिर्हाडीं ॥३॥
नमस्कार करिता देवासी । मन पायपोसापाशीं ॥४॥
लवकर करी प्रदक्षिणा । उशीर झालासे भोजना ॥५॥
एका जनार्दनी स्थिर मन । नाही तंव काय साधन ॥६॥
