वेद बोलिला जो जो गुण
2616.
वेद बोलिला जो जो गुण । तो तो नव्हेची पठण ॥१॥
वेदें सांगितले न करी । ब्रह्माद्वेषीं दुराचारी ॥२॥
न करा सुरापान । कन्या-गो-विक्रय जाण ॥३॥
ऐसे वेदाची मर्यादा । न कळेचि मतिमंदा ॥४॥
निजमुखे स्वये बोले वेदु । न करावा परापवादु ॥५॥
एका जनार्दनी शरण । वेदाचें नोहे आचरण ॥६॥
