वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

का रे तुम्ही निर्मळ

🙏 3. संत तुकाराम · ABH-077055 · अभंग क्र. २६३२

2632.
का रे तुम्ही निर्मळ हरीगुण गाना । नाचत आनंदरूप वैकुंठासी जाना ॥१॥
काय गणिकेच्या याती अधिकार मोठा । पापी अजामेळ ऐसा नेला वैकुंठा ॥धृपद॥
ऐसे नेणो मागे किती अनंत अपार । पंच महादोषी त्यांच्या पातका नाही थार ॥२॥
पुत्राचिया लोभे नष्ट म्हणे नारायण । कोण कर्तव्य तुका म्हणे त्याचे पुण्य ॥३॥

अर्थ :
अहो तुम्ही निर्मळ हरीचे गुण का गात नाहीत आणि आनंदाने नाचत वैकुंठाला का जात नाही ? त्या गणिकेचा अधिकार आणि जात अशी किती मोठी होती आणि पापी अजामेळ देखील देवाने वैकुंठाला नेलाच. अरे मागे असे कितीतरी अनंत अपार असे पंचमहादोषी पातकी होते की त्यांच्या दोषाला पारावारच नव्हता इतके मोठे त्यांचे दोष होते तरी देखील देवाने त्यांचा उध्दार केला. तुकाराम महाराज म्हणतात, दुष्ट नष्ट अशा अजामेळाने पुत्राच्या लोभाने नारायणा असे म्हटले तर त्याचा उध्दार झाला नाहीतर त्याचे असे कोणते कर्म होते किंवा कोणते पुण्य होते की त्याचा उध्दार व्हावा तात्पर्य असे की हरीनामामुळेच त्याचा उध्दार झाला.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग