घालुनी आसन पोटी भाव
2646.
घालुनी आसन पोटी भाव नाही । वाया केली पाही विटंबना ॥१॥
देव सर्वांभुती तयासी न कळे । वाउगें गवाळें पसरिले ॥२॥
अंतरी तो हेत द्रव्य मिळेल कांही । वरपांग दावी वेषधारी ॥३॥
एका जनार्दनी ऐसीया सोंगासी । काय देवा त्यासी दंड करा ॥४॥
