वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

आता द्यावे अभयदान ।

🙏 3. संत तुकाराम · ABH-077350 · अभंग क्र. २६४०

2640.
आता द्यावे अभयदान । जीवन ये कृपेचे ॥१॥
उभारोनी बाहो देवा । हात ठेवा मस्तकी ॥धृपद॥
नाभी नाभी या उत्तरे । करुणाकरे शांतवीजे ॥२॥
तुका म्हणे केली आस । तो हा दिस फळाचा ॥३॥

अर्थ :
देवा मला तुम्ही अभयदान दयावे तुमच्या कृपेनेच मी जीवन जगू शकेन. देवा तुमचे दोन्ही बाहू वरती करा आणि तुमचे हात आमच्या मस्तकावर ठेवा. तू भिऊ नकोस तू भिऊ नकोस अशा प्रकारचे शब्द उच्चारुन माझ्यावर करुणा करुन देवाने माझे सांत्वन करावे. तुकाराम महाराज म्हणतात, मी जी अपेक्षा केली होती त्याचे फळ प्राप्त होण्याचा हा आजचा दिवस आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग