वेदाचिया बोला कर्मात
2613.
वेदाचिया बोला कर्माते गोंविला । परी नाही भजला संतालागी ॥१॥
घोकूनियां वेद द्वैत नवजाय । वाउगाची होय श्रम तया ॥२॥
तया अद्वैताच्या वाटां जायतो करंटा । शीण तो अव्हाटा आदिअंत ॥३॥
एका जनार्दनी संतांसी शरण । गेलीया पठण सर्वजोडे ॥४॥
