कामक्रोध लागले मागे
2637.
कामक्रोध लागले मागे । तप करुनी काय सांगे ॥१॥
कायसा जाशी वनांतरीं । कामक्रोध भरले अंतरी ॥२॥
वनी जाऊनिया चिंता । रात्रंदिवस घोकिशी कांता ॥३॥
योग अभ्यास न कळे वर्म । शिणतो मूढ धांवतें कर्म ॥४॥
कर्मे लिहलीं न चुके रेखा । म्हणे जनार्दनी एका ॥५॥
