वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

जेथे पाहे तेथे कांडि

🙏 3. संत तुकाराम · ABH-077332 · अभंग क्र. २६५४

2654.
जेथे पाहे तेथे कांडिती भूस । चिपाडे चोखूनि पाहाती रस ॥१॥
काय सांगो देवा भुलले जीव । बहु यांची येतसे कीव ॥धृपद॥
वैकुंठीचे मोटळे लटिकेचि फुगे । पेणिया जाऊनि भिक्षा मागे ॥२॥
तुका म्हणे का उगेचि खोल । जवळी दाखवी आपणा बोल ॥३॥

अर्थ :
मला जिकडे तिकडे लोक व्यर्थ भूस कांडत असताना आणि चिपाडे चोखूनमध्ये रस निघतो आहे काय हे करत असताना दिसतात. देवा अशा प्रकारे हे लोक भुलले आहेत तुला काय सांगू आणि मला हे लोक असे वागतात त्यामुळे त्यांची खूप कीव येते. देवा अरे काही लोक तर असे आहेत की जे लोकांना म्हणतात, आमचा देह म्हणजे वैकुंठावरुन आलेला आहे असे खोटे सांगून व्यर्थ खूपतात आणि त्यांना भूक लागली की तेच लोक दारोदारी जाऊन भिक्षा मागतात. तुकाराम महाराज म्हणतात, असे काही लोक आहेत जे परमार्थातील उच्च कोटीचे बोल लोकापुढे वापरतात आणि स्वत:ची विद्वत्ता लोकापुढे का उगचंच दाखवतात ?

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग