पडिली हे रूढि जगा पर
2652.
पडिली हे रूढि जगा परिचार । चालविती वेव्हार सत्य ह्मूण ॥१॥
मरणाची का रे नाही आठवण । संचिताचे धन लोभ हेवा ॥धृपद॥
देहाचे भय ते काळाचे भातुके । ग्रासूनि ते एके ठेविलेसे ॥२॥
तुका म्हणे काही उघडा रे डोळे । जाणोनि अंधळे होऊ नका ॥३॥
अर्थ :
जगामध्ये अशी रुढी प्रस्थापित झाली आहे की देह आणि प्रपंचातील व्यवहार हे सत्य आहेत त्यामुळेच तर लोक प्रपंच करतात. पण तुला मरणाची तरी कशी आठवण नाही राहिली का रे धनाचा हेवा धरुन त्याचा संचय करतो कशासाठी ? अरे देहाला तर काळाचे भय आहे ते तर काळाच खाऊच आहे काळाने देहाला केव्हाच ग्रासून ठेवले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, अरे तुम्ही आता तरी डोळे उघडा रे सर्व जाणून देखील तुम्ही असे आंधळे होऊ नका.
