वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 88. पुराणिक - अभंग २६१९ ते २६२५

आवाडीने माता बोले बा

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085452 · अभंग क्र. २६२२

2622.
आवाडीने माता बोले बाळकासी । तंव तो म्हणे विवसा पाठी लागे ॥१॥
सांगे लोकांपाशीं ब्रह्मज्ञान । झाला स्त्रीं आधीन स्वदेंहें तो ॥२॥
बैसोनी बाजारीं सांगे ज्ञान गोष्टी । मातेसी करंटी म्हणे नष्ट ॥३॥
एका जनार्दनी ते जन अधम । चौर्‍याशीं लक्ष जन्म भोगिताती ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग