मुक्त - अभंग २६४७
2647.
मुक्त - अभंग २६४७
आम्ही मुक्त म्हणोनि विचरती महीं । मुक्त ही पदवी नाही अंगी ॥१॥
सैर धांवे मन नाही पै अटक । मुक्तज्ञान मौक्तिक वाया जाय ॥२॥
भूतमात्रीं द्रोही करिती नानापरी । वेदशास्त्र निर्धारी ठाउकें नाही ॥३॥
एका जनार्दनी कायसे ते मुक्त । जगी जाणा फजींत नलाजरे ॥४॥
