संन्यासी - अभंग २६२६
2626.
संन्यासी - अभंग २६२६ ते २६३५
रडती पोटासाठीं । झालों म्हणती संन्यासी ॥१॥
वर्म न कळेची मुढां । होतो फजित रोकडा ॥२॥
जनीं नारायणा । अवघा भरला जनार्दन ॥३॥
तडातोडी करूनी वर्म । चुकला तो अधम ॥४॥
सर्वांठायीं नारायण । एका जनार्दनी भजन ॥५॥
