उसंतिल्या कर्मवाटा ।
2643.
उसंतिल्या कर्मवाटा । बहु मोटा आघात ॥१॥
शीघ्र यावे शीघ्र यावे । हाती न्यावे धरूनि ॥धृपद॥
भागलो या खटपटे । घटपटे करिता ॥२॥
तुका म्हणे कृपावंता । माझी चिंता खंडावी ॥३॥
अर्थ :
देवा संचितकर्मचा वाटा मी फेडित आलो आहे परंतू तसे करताना मला खूप आघात होत आहेत. त्यामुळे हे देवा तुम्ही लवकर लवकर या आणि मला हाताला धरुन न्यावे. देवा संसाराची खटपट आणि घटपट या न्यायांचा विचार केला आणि त्यामुळे मी खूप भागलो आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हे कृपावंता माझ्या हया चिंतेचे तुम्ही खंडण करावे.
