दूरि तोचि होतो आपुले
2660.
दूरि तोचि होतो आपुले आशंके । नव्हते ठाउके मूळ भेद ॥१॥
आता जेथे तेथे येइन सांगाते । लपाया पुरते उरो नेदी ॥धृपद॥
मिथ्या मोहो मज लाविला उशीर । तरी हे अंतर झाले होते ॥२॥
तुका म्हणे का रे दाखविसी भिन्न । लटिकाचि सीण लपंडाई ॥३॥
अर्थ :
देव आणि मी एकच स्वरुप आहोत हेच खरे वर्म मला माहित नव्हते त्यामुळेच मी देवापासून शंकेने दूर होतो. देवा आता जेथे जाशील तेथे मी तुझ्यासंगतीतच राहीन तुला लपायला मी कोठेच जागा उरु देणार नाही. देहाच्या मिथ्य मोहानेच तर मला तुझ्याशी ऐक्य पाहण्यास उशीर लावला त्यामुळे तुझ्यात आणि माझ्यात अंतर निर्माण झाले. तुकाराम महाराज म्हणतात, तू मायेच्या आड लपून काहीतरी वेगळेच दाखवितोस मायेच्या आड लपून तू लपंडाव खेळून आम्हाला खोटा प्रकार दाखवतो आणि दु:ख देतोस.
