जे ज्याचे जेवण । तेच
2614.
जे ज्याचे जेवण । तेचि याचकासी दान ॥१॥
आता जाऊ चोजवीत । जेथे वसतील संत ॥धृपद॥
होती धाली पोटे । मागे उरली उच्छिष्टे ॥२॥
तुका म्हणे धाव । पुढे खुंटईल हाव ॥३॥
अर्थ :
जेवण करताना आपण जे अन्न खातो तेच अन्न याचकाला दान दयावे. आता संत ज्या ठिकाणी वस्ती करतात त्या ठिकाणाचा शोध घेऊन आपण तेथे याचक होऊन जाऊ. संतांनी जे उच्चिष्ट मागे ठेवले आहे तेच खाऊ व त्यानेच पोटाची तृप्ती होईल. तुकाराम महाराज म्हणतात, संतांच्या उच्चिष्ट सेवनाने जन्ममरणाची धाव आणि इच्छा करण्याची हाव खुंटेल.
