लगोरी - अभंग १९१ ते
191.
लगोरी - अभंग १९१ ते १९२
खेळ मांडिला लगोरी । खेळताती नानापरी । चेंडु घेउनि अपुलें करी । खेळताती एकमेक ॥१॥
देती आपुलाला डाव । ज्याचा जैसा आहे भाव । तोचि जिंकीतसे वैभव । आणिक पहाती उगे वाव ॥२॥
बरोबर करु गडी । नाही विषमता जोडी । चेंडु हाणती तांतडी । येती हरिया बैसती गडी ॥३॥
एका जनार्दनी कान्होबा भला । खेळा गोविलें की सकळा । आपण असेचि निराळा । नवल कळा पाहे डोळा ॥४॥
