वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 7. संत निवृत्तीनाथ › 1. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा › १. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४ › १. संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा

आम्हा जप नाम गुरुखूण

🙏 7. संत निवृत्तीनाथ · ABH-090061 · अभंग क्र. १८५

185.
आम्हा जप नाम गुरुखूण सम । जन वन धाम गुरुचेचि ॥१॥
नेघो कल्पना न चढो वासना । एका पूर्णघना शरण जाऊ ॥२॥
तप हे अमूप नलगे संकल्प । साधिता संकल्प जवळी असे ॥३॥
निवृत्ति म्हणे मज निरोपिले धन । हेचि ब्रह्मखुण जाणिजेसु ॥४॥

अर्थ:
आम्हाला नामजपाची खुण गुरु समानच असल्यामुळे आम्हाला हे जन किंवा वन हे श्रीगुरुंचे आहेत असे वाटते. कोणत्याही कल्पनेत न अडकता वासनेला स्वतवर आरुढ न होऊ दिल्यामुळे मला त्या एकमेव पुर्णघन हरिला शरण जाता आले. तो परमात्मा आमच्या जवळ असल्याने आम्हाला साधनेचे संकल्प न करता अमुप तप करता आले.निवृतिनाथ म्हणतात, तो नाम धनाचा ठेवा श्री गुरु गहिनीनाथानी दिल्यामुळे त्या परब्रह्माची खुण आम्हाला समजली.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग