बारा सोळा अठरा गडिया
185.
बारा सोळा अठरा गडियांचा मेळ
बारा सोळा अठरा गडियांचा मेळा । मांडियेला डाव कोण आवरीं तयाला ॥१॥
खेळा भाई विटिदांडु । खेळा भाई विटिदांडु । खेळ खेळतां परी बरा नोहे सहज दांडु ॥२॥
पांच सात बारा नव तेरा यांची नका धरु गोडी । खेळ खेळता दांत विचकुन पडाल घशींतोंडीं ॥३॥
एका जनार्दनी काय वाचा शरण रिघां पायी । खेळ तो अवघा सोपा मग प्रेमा उणें नाही ॥४॥
