वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › ८, उपदेश > अभंग १८९ ते ३२५

शरीर वरिवरि का दंडिस

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074802 · अभंग क्र. १८९

189.
शरीर वरिवरि का दंडिसी ।
जव वारिले न करी तुझे मन ।
जळी नेत्र लाउनी ठोकती अविंशा लागोनी ।
तैसे नको ना बकध्यान करु रया ॥
चित्त सुचित की मन सुचित्त की ।
न धरी तू विषयाची सोय ।
वनी असोनी वनिता चिंतिसी ।
तरी तपचि वाउगे जाय रया ॥
त्रिकाळ स्नान करिसी तीर्थजळी ।
परि नवजाती मनींचे मळ ।
तुझियानि दोष तीर्थ कुश्चित जाली ।
जैसी त्या रजकाची शीळ रया ॥
आंता करिसी तरी चोखटच करी ।
त्यासी साक्ष तुझे मन ।
लटिके न झकवसी तऱ्ही ।
देव दुऱ्हा होसी बापरखुमादेविवरा ।
विठ्ठलाची आण ॥

अर्थ :
मनातील इच्छा संपल्या नाहीत मग वरवर देहाला दंडण देऊन काय उपयोग. माश्याच्या मिशाने जसे बगळा पाण्यात ध्यानस्थ उभा दिसतो तसे तु ध्यान लावु नकोस. विषयांची सोय न पाहता स्वतःचे चित्त व मन शुध्द कर. वनात राहुन वनितेचा विचार केल्यास तुझे तसे केलेले तप वाया जाईल. तिनवेळा स्नान व अनेक तीर्थस्नाने करुन तुझ्या मनाचा मळ गेला नाही. उलट तुझ्या स्नानाने तीर्थ ही अपवित्र होतील जसा त्या तीर्थात असलेला धोब्याचा दगड अपवित्र असतो. आता जे करशील ते चांगले कर व तुझ्या मनाला त्याचा साक्षीदार कर. जर लबाडी करशिल तर माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल यांची शपथ आहे ते अशाने प्राप्त होणार नाहीत असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग