साकार निराकार ब्रह्म
189.
साकार निराकार ब्रह्मीचे विकार । तेथील अंकुर गुरुराज ॥१॥
रज तम नाही सात्विक तेही । परिपूर्ण देही आत्माराम ॥२॥
सर्वघटवासि सर्वत्रनिवासी । आपण समरसी बिंबलासे ॥३॥
निवृत्तिची खुण गुरूचा उद्गार । सर्व हा निर्धार आत्माराम ॥४॥
अर्थ:
सगुण व निर्गुण होणे हे त्या परब्रह्माचे स्वरुप आहे हे गुरुनी सांगितले आहे. ज्या देहात रज व तम नाहीत तो सात्विक देह असतो व त्या परिपुर्ण देहात आत्माराम असतो. ते परब्रह्म सर्व शरिरात विराजत असते व ते स्वप्रकाशाने बिंबत असते. त्या सर्वत्र असणाऱ्या आत्मारामाला पाहण्यासाठी श्री गुरु गहिनीनाथांच्या तोंडातुन निघालेल्या शब्दातुन खुण सापडते
