परमअमृते रसना ओलावल
185.
परमअमृते रसना ओलावली । मनाची राहिली वृत्ति पायी ॥१॥
सकळही तेथे वोळली मंगळे । वृष्टि केली जळे आनंदाच्या ॥२॥
सकळ इंद्रिये झाली ब्रम्हरुप । ओतले स्वरुप माजी तया ॥३॥
तुका म्हणे जेथे वसे भक्तराव । तेथे नांदे देव संदेह नाही ॥४॥
