होईल तो भोग भोगीन आप
187.
होईल तो भोग भोगीन आपुला । न घली विठ्ठला भार तुज ॥१॥
तुम्हांपासाव हे इच्छीतसे दान । अंतरींचे ध्यान मुखी नाम ॥धृ॥
नये काकुलती गर्भवासांसाटी । न धरी हे पोटी भय काही ॥२॥
तुका म्हणे मज उदंड एवढे । न वांचावे पुढे मायबापा ॥३॥