तुजविण येकली रे कृष्
186.
तुजविण येकली रे कृष्णा न गमे राती । तंव तुंवा नवल केले वेणू घेउनी हाती ।
आलीये तेचि सोय तुझी म्या ओळखली गती ॥१॥
नवल हे वालभ रे कैंसे जोडले जीवा । दुसरे दुरी ठेले प्रीती केला रिघावा ॥धृ॥
पारू रे पारू कान्हा झणे करिसी अव्हेरू । तू तंव हृदयींचा होसी चैतन्य चोरू ।
बापखुमादेविवरू विठो करी का अंगिकारू ॥३॥
