वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 10. निवडक अभंग › 5. तुकाराम निवडक अभंग

घरोघरी अवघे जाले ब्र

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-072675 · अभंग क्र. १९२

192.
घरोघरी अवघे जाले ब्रम्हज्ञान । परि मेळवण बहु माजी ॥१॥
निरे कोणापाशी होय एक रज । तरि द्या रे मज दुर्बळासी ॥धृ॥
आशा तृष्णा माया कालवूनि दोन्ही । दंभ तो दूरोनि दिसतसे ॥२॥
काम क्रोध लोभ सिणवी बहुत । मेळवूनि आंत काळकूट ॥३॥
तुका म्हणे तेथे काही हाता नये । आयुष्य मोले जाये वांयांविण ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग