वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 3, संतांच्या गौळणी › ७, संत ज्ञानेश्वर गौळणी

घनु वाजे घुणघुणा । व

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073185 · अभंग क्र. १९०

190.
घनु वाजे घुणघुणा । वारा वाहे रूणझुणा ।
भवतारकू हा कान्हा । वेगी भेटावा का ॥धृ॥
चांद वो चांदणे । चापे वो चंदनु ।
देवकीनंदनेंवीण नावडे वो ॥२॥
चंदनाची चोळी । माझे सर्व अंग पोळी ।
कान्हो वनमाळी । वेगी भेटवा का ॥३॥
सुमनांची सेज । शितळ वो निकी ।
पोळे आगीसारीखी । वेगी विझवा का ॥४॥
तुम्ही गातसा सुस्वरे । ऐको नेदावी उत्तरे ।
कोकिळे वर्जावे । तुम्ही बाईयांनो ॥५॥
दर्पणी पाहता । रूप न दिसे आपुले ।
बापखुमादेविवरू विठ्ठले । मज ऐसे केले ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग