त्रिगुणात्मक माडियेल
192.
त्रिगुणात्मक माडियेला डाव । सहा चार अठरा गडी वांटिले एका त्यांचे नाव ॥१॥
कान्होबा खेळू लागोरीचा खेळ । तुम्ही आम्ही मिळूं एका ठायी सहज होईलमेळा ॥२॥
चौदा बारा सोला पंचविसाचा करुनी मेळ । एक एका पुढे पळती अवघा हलकलोळ ॥३॥
एका जनार्दनी म्हणे कन्होबा खेळ अतु आवरीं । खेळ खेळतां शिणलों आम्ही पुरे बा वेरझारी ॥४॥
