वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 16. संत जनाबाई › 1. संत जनाबाई गाथा 350 अभंग › 1. संत जनाबाई अभंग गाथा › 8. आत्मस्वरूप स्थिती

नम्रतेविण योग्यता मि

🙏 16. संत जनाबाई · ABH-073802 · अभंग क्र. १८९

189.
नम्रतेविण योग्यता मिरविती । ते केवी पावती ब्रह्मसुख ॥1॥
लटिके नेत्र लावूनि ध्यान पै करिती । ते केवी पावती केशवाते ॥2॥
एक संत म्हणविती नग्न पै हिंडती । अंतरींची स्थिति खडबड ॥3॥
झालेपणाचे गुण दिसताती सगुण । वस्तु ते आपण होऊनि ठेली ॥4॥
सागरी गंगा मिळोनि गेली जैसी । परतोनि तियेसी नाम नाही ॥5॥
नामयाची जनी निर्गुणी बोधिली । ठेवा जो लाधली पांडुरंग ॥6॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग