वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › ७, बाळक्रीडा, अभंग १६७ ते १८८

कोवळे ठुसठुसित मोतिय

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074904 · अभंग क्र. १८७

187.
कोवळे ठुसठुसित मोतियांचे घड ।
शृंगारिले गूढ जया लेणी ॥
बैसोनिया रथी सुरनर खेळती ।
देखोनिया पशुपती वेडवला ॥
युक्ति खुंटली वासना निमाली ।
कळा पॅ बैसली पद्मासनी ॥
होय की नव्हे ज्ञानदेव पुसती ।
आठविता निवृत्ती भेटी होये ॥

अर्थ :
त्या श्रीकृष्ण परमात्म्याला काय वर्णावे, त्या परमात्म्याचे अंग म्हणजे कोवळ्या ठुसठुसीत म्हणजे पाणिदार व मनाला वेध लावण्यासारखे मोत्यांचा शृंगारा घडविल्या सारखे आहे. असा तो सुरनर म्हणजे श्रीकृष्ण परमात्मा रथात बसून क्रीडा करीत आहे. ते त्याचे ऐश्वर्य पाहून साक्षात शंकरही वेडावून गेले आहेत. त्याकडे पाहाताच त्याच्या प्राप्तीची युक्ती काय ह कळेनासे होऊन ती प्राप्त करुन घेण्याची वासनाच नाहीसी झाली. सर्व कला पद्मासन घालून त्या कृष्ण स्वरुपांत बसल्या आहेत. ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीरायांना विचारतात ज्याच्या दर्शनाने भगवान शंकर वेडे झाले तोच हा श्रीकृष्ण परमात्मा ना? निवृत्तीरुप जो श्रीकृष्ण परमात्मा त्याची भेट झाली. म्हणजे दर्शन झाले असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग