वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › ८, उपदेश > अभंग १८९ ते ३२५

तापत्रयी तापली गुरूत

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074819 · अभंग क्र. १९३

193.
तापत्रयी तापली गुरूते गिवसिती भगवे देखुनी म्हणती तारा स्वामी ।
तव ते नेणोनि उपदेशाची रीती आनान उपदेशिती ठकले निश्चिती तैसे झाले ॥
संत ते कोण संत ते कोण । हे जाणवी खूण केशीराजा ॥
कोणी एक प्राणी क्षुषेने पडिले । म्हणोनि दोडे तोडे गेले ।
खावो बैसे तो नुसधि रूई उडे । ठकले बापुडे तैसे झाले ॥
कोणी एक प्राणी प्रवासे पिडिला । स्नेहाळे देखिला विबवातु ।
तयाचे स्नेह लाविता अगी । सुजला सर्वागी तैसे जाले ॥
कोणी एक प्राणी पडिलासे झडी । म्हणोनी गेला पैल तो झाडी ।
खा खात अस्वली उठली लवडसवडी । नाक कान तोंडी तैसे जाले । ॥
ऐशा सकळ कळा जाणसी । नंदरायाचा कुमर म्हणविसी ।
बापरखुमादेविवरू विठ्ठली भेटी । पडली ते न सुटे जिवेसी ॥

अर्थ :
त्रिविध तापाने तापलेले भगवे वस्त्र घातलेल्याला गुरु म्हणतात व तारस्वरात मला तारा म्हणतात. पण त्या केलेल्या गुरुलाच ज्ञान नसल्याने ते भलताच उपदेश करतात. व त्यांची फसवणुक होते. हे केशीराजा हे संत कोण आहेत त्यांची खुण कोणती? कोणी एक माणसाने भुक लागली म्हणुन कापसाची बोंड आणली व ती फोडली तशी ती रुई उडुन जाऊ लागली. व त्या बापड्याची फसवणुक झाली. कोण्या प्रवाश्याने थकला म्हणुन सर्वांगास बिंब्याचे तेल लावले ते त्याच्या अंगावर उतले व त्याच्या सर्वांगाला सुज आली. कोणी एक पाऊसाच्या झडी पासुन वाचण्यासाठी झाडीत शिरला तिथे असलेल्या अस्वलाने त्याचे नाक, कान व तोड तोडुन ताबडतोब खाल्ले. अशा सर्व कळा तु नंदरायाचा कुमार होऊन जाणतोस. माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल यांची भेट झाली की ती जीवापासुन सुटत नाही असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग