शुद्ध चर्या हे चि सं
189.
शुद्ध चर्या हे चि संताचे पूजन । लागत चि धन नाही वित्त ॥१॥
सगुणाचे सोई सगुण विश्रांती । आपण चि येती चोजवीत ॥धृ॥
कीर्तनी चि वोळे कृपेचा वोरस । दुरीपणे वास संनिधता ॥२॥
तुका म्हणे वर्म सांगतो सवंगे । मन लावा लागे स्वहिताच्या ॥३॥
