वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 22. संत चोखामेळा, चोखोबाराय › 1. संत चोखामेळा अभंग गाथा › १. संत चोखामेळा अभंग गाथा ३५८ › ७. नाम

गणिका अजामेंळे काय स

🙏 22. संत चोखामेळा, चोखोबाराय · ABH-075235 · अभंग क्र. १९१

191.
गणिका अजामेंळे काय साधन केले । नामाचि उच्चारिले स्वभावता ॥१॥
नवल हे पहा नवल हे पहा । अनुभवे अनुभवा देहामाजी ॥२॥
उच्चारिता नाम वैकुंठीचे पेणे । ऐसे दुजे कोणे आहे कोठे ॥३॥
ब्रम्हहत्या जयासी घडल्या अपार । वाल्हा तो साचार उध्दरिला ॥४॥
सुफराटे नाम न येचि मुखासी । मारा मारा ध्यासी स्मरता झाला ॥५॥
चोखा म्हणे ऐसा नामाचा महिमा । उध्दार अधमा स्त्री शूद्रा ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग