वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 103. श्रीकृष्ण चाणूर व बलराम मुष्टिक यांचे मल्लयुद्ध

श्रीकृष्ण चाणूर बलरा

🙏 4. संत नामदेव · ABH-083174 · अभंग क्र. १९१

191.
श्रीकृष्ण चाणूर बलराम मुष्टिक यांचे मल्लयुद्ध

चौदा भुवने वसे ज्याचे पोटी । त्यासी आणी जेठी मारावया ॥१॥
इंद्रादि सुरवर जयाचे किंकर । त्यासी आणी पामर झोंबीसाठी ॥२॥
अतुर्बळी तेव्हा दिसे नारायण । जळताती मने वैरियांची ॥३॥
कंसाचे अंगणी उभा असे देव । जैसा ज्याचा भाव तैसा भासे ॥४॥
कृष्णाते देखोनी वल्गना करिती । चोळिताती माती दंडालागी ॥५॥
बळिभद्रासी खूण दावियेली तेव्हा । उशीर न लावा मारायासी ॥६॥
नामा म्हणे एक उरला असे कंस । वधती सकळांस दोघेजण ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग