अक्रूरची श्रीकृष्णास
188.
अक्रूरची श्रीकृष्णास प्रार्थना
जोडोनिया कर विनवी विश्वंभरा । चलावे मंदिरा सकळिकी ॥१॥
अनाथावरी कृपा करा कृष्णनाथा । ठेवीतसे माथा पायांवरी ॥२॥
मारूनिया कंस येईन तुझ्या घरा । आग्रह अक्रूरा करू नको ॥३॥
सकळ समुदाय मथुरेचे वनी । साह्य चक्रपाणी ह्मणे नामा ॥४॥
