श्रीकृष्णाचे मथुरेची
186.
श्रीकृष्णाचे मथुरेची प्रयाण व त्यानिमित्त गोपीकांचा शोक
प्रात:काळी मात झाली गोकुळांत । जातो भगवंत मथुरेसी ॥१॥
गौळणींचा मेळा मिळाला सकळ । पिटिती कपाळ आपुले हाते ॥२॥
एकी त्या घालीती केंसामध्ये माती । एक त्या लोळती भूमीवर ॥३॥
आह्मा सोडूनिया तू रे कैस जासी । तुजविण पीशी आह्मी सर्व ॥४॥
कोणी रथापुढे जाऊनि पडली । आक्रोशे रडती सकळीक ॥५॥
अक्रूर नव्हे बाई मोठा असे क्रूर । नामी निरंतर क्रीया वसे ॥६॥
अक्रूर आह्मी सर्व पसरीतो पदर । नेऊ नको श्रीधर मथुरेसी ॥७॥
नामा ह्मणे शोक न वर्णवे आता । झाला तो हाकिता रथ त्वरे ॥८॥
