वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › १. संत निळोबा गाथा भाग १ › ५. विरहिणी

एकले न कंठचे याविण म

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089778 · अभंग क्र. १९२

192.
एकले न कंठचे याविण मज आता ।
घेवोनि विचरेन सवे प्राणनाथा ।
जनी वली वो एकांति वसता ।
न करि वेगळा हो युगे कल्प जाता वो ॥१॥
हाती लागला वो युगादिचा निध ।
भाग्ये माझिया वे जोडियला सिध्द ।
करुनि उपचार पूजिन सावध ।
न वंची शरीर सेविन एकविध वो ॥२॥
याचिये संगती वो सुखाचिया कोडी ।
वेचता युगे कल्प मज वाटे घडी ।
भोगीन नित्य नवा जीवाचे आवडी ।
भरुनि निज दृष्टी पाहेन घडी घडी वो ॥३॥
अवघे निवेदिन अंतरीचे भोग ।
यासि करुनिया सये अंगसंग ।
काही न वंचिता मन बुध्दी अंग ।
भोगिन निजशेजे श्रीरंग वो ॥४॥
त्यागे जीवाचिया घालीन यासि मिठी ।
जाता युगसंख्या कल्पाचिया कोटी ।
धरिन अंतरी वो बांधोनिया गाठी ।
यावरी न करि मी कदा यासि तुटी वो ॥५॥
कळे अंतरीचा भाव या परेशा ।
होय प्रियवादे जैसा केला तैसा ।
पुरवी निजदासी केला जो धिवसा ।
निळा म्हणे आहे कृपावंत ऐसा वो ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग