अक्रूराची चिंतातूर स
187.
अक्रूराची चिंतातूर स्थिती.
ब्रह्मनिष्ठ तेव्हा स्थिरावला चित्ती । अक्रूराचे गळती दोन्ही नेत्र ॥१॥
दहींदूधतूप भरिल्या कावडी । चालती तांतडी सकळीक ॥२॥
चिंतेने व्यापिले अक्रूराचे मन । काय वर्तमान होईल नेणे ॥३॥
नरनारी शोक करीती सकळ । दुराचारी खळ कंस आहे ॥४॥
मारगी स्नानासी उतरे अक्रूर । रथावरी किशोर नंदजीचे ॥५॥
सोडोनिया घोडी चालिला तांतडी । दिल्ही असे बुडी जळां-मध्ये ॥६॥
दावोनी कौतुक निरसी त्याचा धाक । सांगतसे शुक परिक्षिती ॥७॥
जुंपोनिया घोडी चालिला सत्वर । लपे दिनकर नामा ह्मणे ॥८॥
