आम्हा न कळे ज्ञान न
188.
आम्हा न कळे ज्ञान न कळे पुराण । वेदांचे वचन न कळे आम्हा ॥१॥
आगमाची आठी निगमाचा भेद । शास्त्रांचा संवाद न कळे आम्हा ॥२॥
योग याग तप अष्टांग साधन । न क ळेची दान व्रत तप ॥३॥
चोखा म्हणे माझा भोळा भाव देवा । गाईन केशवा नाम तुझे ॥४॥
