जोड झालीरे शिवासी ।
187.
जोड झालीरे शिवासी । भ्रांत फिटली जिवाची ॥1॥
आनंदची आनंदाला । आनंद बोधचि बोधला ॥2॥
आनंदाची लहरी उठी । ब्रह्मानंद गिळिला पोटी ॥3॥
एक पण जेथे पाही । तेथे विज्ञाप्ति उरली नाही ॥4॥
ऐसी सदुरुची करणी । दासी जनी विठ्ठल चरणी ॥5॥
